Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
अ.नगरशिर्डी

दर्शन पास वितरण काउंटरवर विसरलेली सुमारे आठ हजार रुपये रक्कम असणारी पर्स !त्या महिला साईभक्ताला मिळाली परत!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये अनेकदा साई भक्तांचे पर्स, दागिने हरवतात,गहाळ होतात. मात्र ते संस्थान कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना सापडल्यानंतर अनेकदा ते प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा करतात. त्या साई भक्तांची ओळख पटवून त्यांना ते परत केले जाते. असा हा प्रामाणिक पणाचा सिल्सिला साई संस्थान मध्ये सुरू असल्यामुळे या प्रामाणिकपणाचे कौतुक साईभक्त व शिर्डी आणि परिसरातही होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशीच एक घटना नुकतीच बुधवार दिनांक दिनांक 23/04/2025 रोजी गेट क्रमांक 6 येथील सशुल्क दर्शन पास वितरण काउंटर येथे घडली. येथे जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती रेणुका श्रीनिवास नाईक यांची ड्युटी होती. त्याठिकाणी पास घेणेकरिता आलेल्या एक महिला साईभक्त हे त्यांची छोटी पर्स गडबडीत तेथेच विसरून गेल्या व दर्शनपास घेऊन ते साईभक्त साईंबाबांचे दर्शनाला निघून गेले.

सदर पर्स मध्ये 8160/- रु रोख रक्कम होती. जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती नाईक यांनी तात्काळ ती पर्स व पैसे संरक्षण कार्यालयात जमा केले. थोडया वेळानंतर त्या साईभक्त जी. कल्पना रा. हैद्राबाद ( आ.प्र.) यांनी संरक्षण कार्यालयात येऊन सशुल्क पास वितरण काउंटर येथे पाकीट विसरलेचे सांगितले. त्यांची ओळख पटवून त्यांना पैसे आणि पाकीट परत केले गेले. साई भक्तांना मोठा आनंद झाला.

या साईभक्तांनी साईबाबा संस्थान कर्मचारी श्रीमती रेणुका नाईक यांचे आभार व्यक्त केले. या प्रामाणिक जनसंपर्क विभागाच्या कर्मचारी श्रीमती रेणुका श्रीनिवास नाईक यांचे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button