Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमराजकीय

पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सोडणार नाही’ची धमकी

शिर्डी | प्रतिनिधी :
माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्याचा प्रकार शिर्डीत घडला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत काजल नितेश जगदाळे (रा. सातपूर, त्र्यंबक रोड, नाशिक; हल्ली रा. सावळीविहीर, ता. राहाता) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मे २०१७ मध्ये त्यांचा नितेश राजीव जगदाळे यांच्याशी विवाह झाला. विवाहावेळी त्यांच्या आई-वडिलांनी पतीला सोन्याची चैन, अंगठी तसेच संसारोपयोगी साहित्य दिले होते. सुरुवातीचा सुमारे वर्षभर संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्यांना मुलगा झाला.
मात्र, कालांतराने पतीचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले. दारूच्या नशेत घरी येऊन मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू झाले. काही काळ पती-पत्नी घरच्यांपासून वेगळे राहू लागले, मात्र त्यानंतरही पतीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण, नाहीतर जिवंत सोडणार नाही’
पतीकडून माहेरच्या आई-वडिलांकडून गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन येण्याची मागणी केली जात होती. पैसे आणले नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पती मोबाईलवर दुसऱ्या महिलेशी बोलत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा करून समजावून सांगितले असता, उलट पतीने तिच्याच चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


बैठका होऊनही छळ थांबला नाही
पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी लग्न जमविणारे, सासरचे नातेवाईक तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत दोन-तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही पतीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी काजल जगदाळे यांच्या फिर्यादीवरून नितेश राजीव जगदाळे, शोभा राजीव जगदाळे, राजीव शिवाजी जगदाळे आणि निवृत्ती काळे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button