Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
Blog

नाताळ सुट्ट्या, दत्त जयंती यामुळे शिर्डीत साई भक्तांची वाढली गर्दी!अनेक साई पालख्या व हजारो साई पदयात्री शिर्डीत होत आहेत दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे नाताळ सुट्ट्या व दत्त जयंती तसेच सरत्या वर्षाला निरोप यामुळे साई भक्तांची मोठी गर्दी झाली असून अनेक साई दिंड्या व पदयात्री पायी शिर्डीला दत्त जयंती निमित्त दाखल होत आहेत. त्यामुळे शिर्डी ही साई नामाने दुमदुमून गेली आहे.

sai nirman
जाहिरात


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाताळ सुट्ट्या व शनिवार ,रविवार सोमवार सलग शासकीय सुट्ट्या आल्या आहेत .26 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्त जयंती आहे. त्यामुळे अनेक भाविक शिर्डीला विमान, रेल्वे ,बस,खाजगी प्रवासी वाहनांमधून शिर्डीत दाखल झाले आहेत. होत आहेत. अनेक पायी साई पालख्या व हजारो साई पदयात्री शिरडीत साई दर्शनासाठी येत आहेत .त्यामुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नगर मनमाड महामार्गावरही साई भक्तांची वाहने ,पायी चालणारे साईभक्त, मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सर्वत्र साई भजने, साई भक्तांच्या वाहनांवर स्पीकरवर साई गीते ,साई पालख्या, साई भक्तांचे पालखी समोर नृत्य, यामुळे सर्वत्र साईमय वातावरण दिसून येत आहे. सावळीविहीर निमगाव, निघोज, साई आश्रम, साई पालखी निवारा, राहता या परिसरातही साईभक्त रात्रीचे मुक्काम करताना दिसून येत आहेत.

DN SPORTS

शिर्डीत साई दर्शनासाठी नवीन दर्शन रांगेमध्ये साईभक्त मोठ्या प्रमाणात रांगेमध्ये दिसून येत असून या नवीन दर्शन रांगेमुळे भक्तांची मोठी सोय झाली आहे. दर्शनासाठी वेळ लागत असला तरी नवीन दर्शन रांगेत चहा कॉफी तसेच बसण्याची व्यवस्था व सर्व सुविधा असल्यामुळे साईभक्त समाधान व्यक्त करीत आहेत. साई संस्थान, नगरपालिका, पोलीस यंत्रणा ,आरोग्य विभाग व शासनाच्या सर्व यंत्रणा साई भक्तांच्या सुविधेसाठी सज्ज आहेत. सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी साई भक्तांची शिर्डीत मात्र गर्दी कमी झालेली नाही. येत्या दहा ते पंधरा दिवस शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी राहणार असल्याचे बोलले जात आहे .नाताळ, दत्त जयंती त्याचप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत शिर्डीत व्हावे

kamlakar

म्हणून देश-विदेशातील साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत व दाखल होत आहेत. शिर्डीत अनेक इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने ही शिर्डीत होणारी गर्दी लक्षात येऊन जादा बसेस सोडल्या आहेत. गर्दी काळात साई भक्तांची सुरक्षितता,व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून शिर्डी वाहतूक शाखा, शिर्डी पोलीस, प्रयत्नशील आहेत. गर्दी काळात भाविकांनी विशेषतः महिलांनी मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात ,सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. गर्दीचा फायदा पाकीटमार भामटे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यासाठी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा. असे आवाहनही शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button