Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डीत बेकायदेशीर केलेले हॉटेलचे अनधिकृत बांधकाम न पाडता अतिक्रमण धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीत बेकायदेशीर केलेले हॉटेलचे अनाधिकृत बांधकाम न पाडता  या अतिक्रमण धारकास पाठीशी घालणारे लोकसेवक व न.पा.चे मुख्याधिकारी सतिश दिघे    यांच्यावर कारवाई करावी .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या मागणीसाठी येत्या १८ तारखेपासून मान. जिल्हाधिकारी आहिल्यानगर यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिर्डी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस सो. यांना पाठवलेल्या या पत्रात त्यांनी म्हटले की,
 आपल्या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात अनाधिकृत केलेले व शासनाच्या जागेवर केलेले बांधकाम पाडण्याचे समस्त राज्यातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत सह ग्रामपंचायत  तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांना लेखी सूचना दिल्याने  संपूर्ण राज्यात अतिक्रमण मोहीम सुरु आहे.


मात्र शिर्डी नगर परिषदेच्या हद्दीत पिंपळवाडी रोडवर हॉटेल शिर्डी पार्क इन् मिनी पंजाब रेस्टोरंट हे अनधिकृतपणे नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केलेले आहे. त्या हॉटेल मालकाला नगर परिषदेने सन २०१९ साली ३ वेळेस अनधिकृत बांधकाम पाडण्याची लेखी नोटीस दिलेली होती.  तरीही त्या हॉटेल मालकाने ते अतिक्रमण काढले नाही.

त्यावेळी मी ते अतिक्रमण  पाडावे म्हणून शिर्डी नगर परिषदेच्या समोर  ५ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी हेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी होते. माझे उपोषण सोडवतांना नगर परिषदेने मला लेखी दिले होते कि, सदर हॉटेल मालकाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचे आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल आणि तो दावा २०२४ मध्ये न्यायालयाने फेटाळून लावला असता मी दिनांक १७/०२/२०२५ रोजी आपणांसह संबंधित विभागांना ते अतिक्रमण पाडावे म्हणून अर्ज दिला होता.

तरी ते अतिक्रमण निघाले नाही.  तेव्हा मी हे अतिक्रमण काढले नाहीतर जलसंपदा मंत्री . राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शिर्डी  कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा अर्ज केला होता . त्यावर मला लोणी पोलीस स्टेशनचा फोन आला. त्यांनी उपोषणाबाबत मला विचारले आणि मला संबंधित नगर परिषदेचे अधिकारी यांच्या सोबत चर्चा करा. असे सांगितल्याने मी दिनांक २८/०२/२०२५ व दिनांक ०१/०३/२०२५  रोजी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेबांशी त्या अतिक्रमणाबाबत चर्चा केली असता त्यांनी मला लेखी कळवले की ,

संबंधित अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. परंतु कधी निर्णय घेण्यात येईल हे सांगितले नाही. महाराष्ट्र राज्यातील तसेच शिर्डी शहरातील अनेक ठिकाणाचे अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण काढत असतांना या हॉटेल मालकावर नगर परिषद मेहेरबान का?   किंवा जाणीवपूर्वक  त्या हॉटेल मालकाला काही अवधी द्यायचा म्हणजे तो पुन्हा न्यायालयात जाऊन दावा दाखल करेल.


हे अतिक्रमण पाडू नये यासाठी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे संबंधित हॉटेल मालकाशी  काही आर्थिक व्यवहार झालेले असल्याची मला शंका झालेली आहे .कारण आताही तेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी आहेत. तेव्हा सदरील अतिक्रमण काढण्याचे आदेशित करून संबंधित मुख्याधिकारी यांच्या कारकीर्द बाबत खातेनिहाय  चौकशी करून कारवाई करण्यात यावी. व त्या बाबत माहिती मला लेखी स्वरूपात अवगत करावी तसेच  माझी मागणी होती की ते अतिक्रमण पाडावे.

ती  मागणी मान्य झाली नसल्याने येत्या १८ तारखेला मा. जिल्हाधिकारी सो आहिल्यानगर यांच्या कार्यालया समोर मी उपोषणास बसणार आहे. असे या पत्रात म्हटले असून त्यांनी 18 मार्च 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या पत्रातून दिला आहे. अधिक माहितीसाठी ह्या निवेदनाच्या प्रति त्यांनी १) आयुक्त सो, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई २) श्री.के एच गोविंदराज सो  मा. प्रधान सचिव नगर विकास –

 ३) श्री. असीमकुमार गुप्ता सो अपर मुख्य सचिव नगर विकास – ४)  मा. विभागीय आयुक्त सो नाशिक विभाग नाशिक५) मा. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील लोणी ६) मा. जिल्हाधिकारी सो आहिल्यानगर ७) माहानगर पालिका आहिल्यानगर  ८)मा, पोलीस निरीक्षक सो ,तोफखाना  पोलीस स्टेशन आहिल्यानगर यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button