Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
राजकीयशिर्डी

थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिर्डी : राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफ करावे तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र, प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ केल्यास शेतकरी मूळ रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

kamlakar


यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत आणि संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली होण्याची शक्यता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिर्डी विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान डॉ. पिपाडा यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button