Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

बनावट पनीरचा सगळीकडे वाढला सुळसुळाट! पैसे कमवण्यासाठी अशी ही अवैध धंद्याची वाट!!

शिर्डी (प्रतिनिधी) सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमांचा सपाटा सुरू असल्याने जेवणावळींचा सपाटा सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे पनीरलाही मागणी आहे. मात्र ज्यादा मागणी व ज्यादा किंमत यामुळे बनावट पनीर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे . अनेक हॉटेल ढाब्यांमधूनही डुप्लिकेट पनीरची भाजी ग्राहकांना दिली जात असून अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत असून ग्राहक व नागरिकांमधून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पनीर हल्ली सोन्याच्या किंमतीत विकले जाते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बनावट पनीरची विक्री केली जाते. चंद्रपुरातही अन्न व औषध‌ भेसळ प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर नुकतेच जप्त केले आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत हे पनीर जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या बनावट पनीरची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. शिर्डी व परिसरात ही बनावट पनीरची विक्री होत असल्याची चर्चा आहे.


बनावट पनीर म्हणून चीज अनॅलॉग हा पदार्थ विक्री केला जात आहे. लग्नसराईचा हंगाम व उन्हाळा बघता पनीरची वाढती मागणी लक्षात घेता हे घोटाळे केले जात आहेत. अनेक ठिकाणी धाडी टाकून बनावट जप्त केलेले पनीर जमिनीत पूरुन नष्ट करण्यात आले. चीज अनॅलॉग हा पदार्थ आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर आले आहे.

बनावट पनीर आरोग्यासाठी घातक आहे.
बनावट पनीर एकदोनदा सेवन केल्यास हगवण- उलट्या आदींचा त्रास संभवतो. तर, अशाच प्रकारचे पनीर सातत्याने आहारात आल्यास कर्करोग व हृदयविकाराचा धोका देखील संभवतो. लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर रसायनयुक्त व बनावट पनीर खाल्ल्याने दुष्परिणाम संभवतो. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.


चीज अनॅलॉग म्हणजेच पनीर अनॅलॉग समजले जाते.
चीज अनॅलॉग हा पदार्थ पनीरप्रमाणेच असतो. त्याची चवदेखील पनीरप्रमाणेच असते. मात्र, यात पनीरप्रमाणे पोषकतत्वे नसतात. कारण यात व्हेजिटेबल ऑइलचा वापर केला जाते. यात कोणत्याही प्रकारच्या डेअरी प्रोडक्ट्सचा वापर केला जात नाही. चीज किंवा पनीर अनॅलॉग बनवण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल्स, नट्स,

सोया, टॅपिओका, फॅट यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. चीज अनॅलॉग दूधापासून बनत नाही. शुद्ध पनीरमध्ये असलेल्या पोषक तत्वांची कमी या चीज अनॅलॉगमध्ये असते. त्याची चवदेखील पनीरप्रमाणे नसते. फक्त पनीरसारखाच दिसणारा हा पदार्थ म्हणून त्याची बनावट पनीर म्हणून विक्री केली जाते.

हे पनीर आरोग्यासाठी खूप नुकसानदायक असते. तरीही पैसे कमवण्यासाठी बनावट पनीर वापरले जाते. खरे पनीर हे दुधापासून बनवले जाते. मात्र पनीर हे खरोखर दुधापासून बनवले तर ते महाग पडते. त्यामुळे बनावट पनीर बनवून विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात आहे. मात्र अन्न व औषध भेसळ प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे की काय अशी शंका नागरिकांना येत आहे.

मात्र बनावट पनीर मुळे अनेक आजारी पडत आहेत. याची त्वरित दखल घेऊन शिर्डी व परिसरातही हॉटेल ढाबे त्याचप्रमाणे पनीर विक्री केंद्र ,येथे अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने अचानक धाडी टाकून त्यांची सॅम्पल घेऊन तपासणी करून योग्य ती कडक कारवाई करणे गरजेचे आहे. असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button