Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी

अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मॉक ड्रिलदरम्यान स्मोक हँड ग्रेनेडचा प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातच स्फोट झाल्याने चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस मुख्यालयात जमाव नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मोक हँड ग्रेनेड हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणादरम्यान अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मेढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून एका कर्मचाऱ्याच्या करंगळीचे गंभीर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून पोलीस विभागाकडून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, “हा एक्सप्लोसिव्ह ग्रेनेड नसून स्मोक गॅस ग्रेनेड आहे. जमाव पांगवण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रशिक्षणादरम्यान संबंधित जवानाकडून चुकून लिव्हर पट्टी सुटल्याने त्याच्या हातातच ब्लास्ट झाला.”


मात्र, जखमी प्रशिक्षणार्थी जवानांनी “ग्रेनेड कसे हाताळायचे याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती,” असा गंभीर आरोप केल्याने या संपूर्ण प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “आम्हाला फक्त पिन काढण्यास सांगितले, पण त्यानंतरची प्रक्रिया व्यवस्थित समजावून सांगितली गेली नाही,” असे जखमी जवानांनी सांगितले.
या घटनेनंतर पोलीस प्रशिक्षणातील सुरक्षाव्यवस्था, मार्गदर्शन आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button