Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम

शिर्डी : श्री साईबाबांच्या पावन भूमीत सालाबादप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने गोकुळाष्टमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. श्री साई समाधी मंदिरात होणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, श्री साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळाष्टमीनिमित्त दिवसभर धार्मिक वातावरण राहणार आहे. रात्री ७.२० ते ८.३० वाजेपर्यंत कलाकार हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री १० ते १२ वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन होणार आहे. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा होणार असून, जन्मोत्सवानंतर श्री साईबाबांची शेजारती सुरू होईल.
गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी
शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळाष्टमी उत्सवाचा उत्साह अधिक रंगणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गोपाळकाला कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती होईल, तर त्यानंतर १२.०५ वाजता श्री साई समाधी मंदिर परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.


दहीहंडी सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तीबरोबरच उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने साईभक्त या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रात्री साईंची गावातून मिरवणूक
शनिवारी रात्री ९.१५ वाजता श्रींची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या मिरवणुकीत भाविक सहभागी होणार आहेत. मिरवणूक श्री साई समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती सुरू होणार आहे.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शिर्डी नगरीत दोन दिवस धार्मिक आणि उत्सवी वातावरण राहणार असून, देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या साईभक्तांसाठी हा सोहळा श्रद्धा व भक्तीचा विशेष अनुभव ठरणार आहे. भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने करण्यात आले आहे.
— विष्णुपंत थोरात, मंदिर अधीक्षक, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button