Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरक्राईम

‘टोरेस’च्या संचालकांसह तिघांना धरलं,

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘टोरेस’ कंपनीच्या संचालकांसह तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तानिया कासातोव्हा, सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून दागिने, रोकड घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे. हे आरोपी पसार होऊ नयेत यासाठी ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे.

प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे टोरेस ज्वेलरी ब्रँड फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांमध्ये सुरू करण्यात आला. दागिन्यांचे नाव असले, तरी कंपनीने प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना आणल्या. सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा मिळाला,

मात्र नंतर काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला.सोमवारी सकाळी पाच शाखांवर गोंधळ उडाल्यानंतर, संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी नागरिक तानिया (व्यवस्थापक), तर रशियन नागरिक व्हॅलेंटिना (स्टोअर व्यवस्थापक) हे तिघे सामान बांधून पोबारा करण्याच्या तयारीत होते. त्याआधीच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button