Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
राजकीयशिर्डी

श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भक्तिभावाने भाविक विविध प्रकारच्या मौल्यवान देणग्या श्री साईचरणी अर्पण करत असतात. या श्रद्धेचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.
पंजाब राज्यातील भटींडा येथील साईभक्त श्री अजय कुमार यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची अंदाजे किंमत २९ लाख १९ हजार ८०० रुपये इतकी आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सदर मुकुट श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थानच्या वतीने श्री दराडे यांनी श्री अजय कुमार यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तीभावाचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.
याचबरोबर आज आणखी एका साईभक्ताने सुमारे ५ लाख ४० हजार १६३ रुपये किंमतीचा आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. संबंधित साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
श्री साईबाबांच्या चरणी अर्पण होणाऱ्या अशा मौल्यवान देणग्या केवळ आर्थिक मूल्यामुळे महत्त्वाच्या नसून, त्या भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि साईसेवेप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक मानल्या जातात. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक मोठ्या श्रद्धेने शिर्डीत येऊन साईचरणी आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button