Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्थानमार्फत ११ वी आणि १२ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना होणार एमएचटी-सीईटी कोचिंग सुविधा उपलब्ध!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट हे केवळ अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देत आहे. साईसंस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसाठी सक्षम बनविण्यासाठी, संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशी माहिती साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि अनुभवी संस्था निवडण्याची प्रक्रिया संस्थानने सुरू केली आहे. ही संस्था किमान १० वर्षांचा अनुभव असलेली असावी तसेच त्यांच्या स्टाफमध्ये IITians/NITians यांचा समावेश असणे आवश्यक आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही प्राथमिक अट ठेवण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळू शकेल.
विशेष म्हणजे, संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील १०वी इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी कोचिंग क्लाससाठी पूर्णतः मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे होतकरू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची अडचण न येता उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.


तसेच, जे विद्यार्थी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतील आणि १०वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवतील, त्यांच्यासाठी कोचिंग फी पैकी ५० टक्के रक्कम संस्थानतर्फे भरली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.


याचबरोबर, अनाथ विद्यार्थी आणि एकल मातांची मुले ज्यांनी १० वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असल्यास त्यांची एमएचटी-सीईटी कोचिंग संपूर्ण फी संस्थान मार्फत भरण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थानचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.

गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button