Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षा यांना धक्का-गणेश सोनवणे यांचा दणदणीत विजय- पोपट शिंदे व अरविंद कोते विजयी-विजयी उमेदवारांची यादी वाढल

ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षा यांना धक्का; सरिता गणेश सोनवणे यांचा दणदणीत विजय
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगर परिषदेच्या निकालात आणखी एक मोठा राजकीय उलटफेर समोर आला असून, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांचा पराभव करत सरिता गणेश सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मतदारांनी बदलाचा स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र समोर आले आहे.
: माजी नगराध्यक्षा पराभूत; जनतेचा कौल बदलाच्या बाजूने
माजी नगराध्यक्षा असतानाही अनिता जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, हा निकाल सत्ताधारी गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मतदारांनी कामगिरीच्या आधारे निर्णय घेतल्याची चर्चा शहरभर सुरू असून, सरिता गणेश सोनवणे यांच्या विजयाला जनतेच्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
ब्रेकिंग : छाया पोपट शिंदे बिनविरोध अरविंद कोते विजयी; विजयी उमेदवारांची यादी वाढली
दरम्यान, मतमोजणीतील ताज्या निकालांनुसार
🔹 छाया पोपट शिंदे बिनविरोध
🔹 अरविंद कोते
हे दोन्ही उमेदवार विजयी ठरले असून, नगर परिषदेत त्यांच्या प्रवेशामुळे सत्तासमीकरणे अधिक ठळक होत चालली आहेत. विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निकालांचा धडाका सुरूच; सत्तेचे अंतिम चित्र लवकरच स्पष्ट
शिर्डी नगर परिषदेच्या मतमोजणीत एकामागोमाग एक धक्कादायक निकाल समोर येत असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंतिम निकालानंतर नगर परिषद आणि नगराध्यक्षपदाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार असून, तोपर्यंत प्रशासन हाय अलर्ट मोडवर आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button