Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
राजकीयशिर्डी

साईनगरीत अभिनेत्री जया प्रदा माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून घेतले साईसमाधीचे दर्शन

शिर्डी, दि.–
माजी राज्यसभा खासदार आणि हिंदी-दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांनी आज श्री साईबाबांच्या पवित्र चरणी नतमस्तक होत साईनगरीला भेट दिली. त्यांनी दुपारी आयोजित माध्यान्ह आरतीत विशेष उपस्थिती लावली. आरतीदरम्यान मंदिर परिसरात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी दिसून आली.

sai nirman
जाहिरात

जया प्रदा यांनी शांत, समाधानी वातावरणात श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी काही वेळ समाधीसमोर बसून ध्यान केले व साईबाबांच्या कृपेने आत्मिक शांती मिळाल्याची भावना व्यक्त केली.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थानच्या इतिहास, विविध सुविधा, भाविकांसाठी चालवल्या जाणाऱ्या सेवा याविषयीही जया प्रदा यांना थोडक्यात माहिती देण्यात आली.

DN SPORTS

या भेटीदरम्यान अनेक भाविकांनी जया प्रदा यांच्यासोबत दर्शनदालनात उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. मंदिर परिसरात त्यांच्या भेटीची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, जया प्रदा यांनी शिर्डीच्या स्वच्छता, सुव्यवस्था आणि भाविकांसाठी उपलब्ध व्यवस्थांचे कौतुकही केले.

शिर्डीच्या पावन भूमीत आलेल्या या विशिष्ट पाहुण्याचे आगमन सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले असून, अनेकांनी जया प्रदा यांच्या साईदर्शनाच्या छायाचित्रांना मोठा प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button