Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
क्राईमशिर्डी

माहेरातून पत्नीचेच अपहरण करणाऱ्या पतीला शिर्डी बस स्थानक परिसरातून पोलिसांनी केली अटक!

शिर्डी ( प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यात प्रेमविवाह झाल्यानंतर व घरात ‌काहीसा वादविवाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच अपहरण केले. मात्र अपहरण करतानाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याने पोलिसांनी तपास करून या महिलेची सुटका केली व आरोपीलाही अटक केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका तरुणाचे एका मुलीबरोबर सूत जुळले. दोघांनी आणा भाका घेत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर पतीच्या घरातील सदस्यांशी तसेच पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी आईकडे निघून गेली. पत्नी माहेरी गेल्यानं पती चिंतेत पडला. एके दिवशी त्याची पत्नी आईसोबत बाहेर रस्त्याने चालत जात असताना एका कारमधून त्याने बळाचा वापर करून पत्नीचे अपहरण केले.

पत्नीचे वय १९ वर्षे आहे. विशेष म्हणजे अपहरणाचा हा प्रकार घडत असताना विवाहित महिलेची आईदेखील सोबत होती. आईने खूप विरोध केला. मात्र पतीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या आईलाही मारहाण केली. १९ मार्चला दुपारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला. या अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवून अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली.

त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी साईबाबा पावले नाही तर आमच्या मुलीचे काही खरे नव्हते, असे म्हणत सुटकेचा निश्वास टाकला. तिच्या पतीवर सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्रांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button