Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
राजकीयशिर्डी

शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिर्डी | प्रतिनिधी :
देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन शिर्डी नगरपरिषद कार्यालयात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिर्डी नगरपरिषदेच्या माननीय नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना यावेळी अभिवादन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी तसेच शिर्डी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या विकासासाठी आणि शिर्डी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
उत्साह, राष्ट्रप्रेम आणि एकतेच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे नगरपरिषद परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button