Letest News
कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह
अ.नगरक्राईम

गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच इतर दागिने पळून नेणाऱ्या तीन आरोपींसह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात!

संगमनेर (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

घराबाहेर सांडपाणी टाकण्याकरीता गेलेल्या एका महिलेला 15 जानेवारी 2025 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवुन त्यांचे गळ्यातील मणी मंगळसूत्र तसेच फिर्यादी यांची भावजय यांना देखील कोयत्याचा धाक दाखवून मनी मंगळसुत्र व कानातील वेल बळजबरीने काढुन पळून गेले. त्यानंतर श्री माधव पांडुरंग ढेरंगे यांनी या संदर्भात घारगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की,

DN SPORTS

kamlakar

आपली गळ्यातील चैन, त्यांची पत्नी यांचे मिनी गंठण व आईचे गळ्यातील मनी मंगळसुत्र व कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढुन घेवुन पळुन नेले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशन स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या घडलेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घेत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो संगमनेर विभाग यांचेकडील पथकाला सुचना देवुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो संगमनेर विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,

सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे पत्नीचे व इतर साक्षीदार यांचे दागिने बळजबरीने काढून नेणारे आरोपी हे कुरकुटवाडी ता संगमनेर येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर बाबत तात्काळ पथकास सुचना सदर ठिकाणी रवाना केले असता पथकाने सदर गुन्ह्यातील ०३ आरोपी व ०२ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने

आरोपी गणेश बबन कुरकुटे, सार्थक उल्हास कुरकुटे ,प्रथमेश शांताराम दुधवडे व दोन अल्पवयीन आरोपींना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केलीआहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button