Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
अ.नगरक्राईम

सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू या घटनेच्या निषेधार्थ राहता येथे रस्ता रोको व भव्य मोर्चा!

शिर्डी (प्रतिनिधी) परभणी येथील घटनेचा , संसद भावनात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक केलेले वक्तव्य, सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनांच्या निषेधार्थ राहाता तालुक्यातील आंबेडकर प्रेमी व संविधान प्रेमी नागरिकांनी रास्ता रोको करीत मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेडकर प्रेमी नागरिक एकत्रित येऊन या घटनांचा निषेध केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अनेकांकडून निषेधार्थ काळा ड्रेस परिधान करून व काळ्याफिती लावून निषेध नोंदवला. मोर्चा प्रारंभी स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत अंतर चालत जाऊन मोर्चेकरांनी पोलीस स्टेशन समोर शिर्डी नगर महामार्गावर प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको करीत अमित शहा यांच्या निषेधार्थ जोरजोरात घोषणा दिल्या

तसेच परभणी येथील घटनेचा व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड,सिमोन जगताप,गौतम गायकवाड ,सचिन चौगुले ,विशाल कोळगे ,प्रदीप बनसोडे रिपाई चे सुरेंद्र थोरात,संदीप सोनवणे,संध्या थोरात,प्रभावती घोगरे,रशीद शेख आदींची भाषणे झाली.
या सर्वांनी या तीनही घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला निषेधार्थ घोषणानंतर उपस्थित संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करत महसूल विभागाचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले

राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
ठिया आंदोलनाच्या दरम्यान महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती निवेदनानंतर आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोर्चा विसर्जित केला या मोर्चाप्रसंगी प्रदीप बनसोडे,धनंजय निकाळे राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे,यांच्यासह उद्योजक मुन्नाभाई शहा, हरदास गायकवाड,

गंगाधर गमे, आसिफ खाटीक,पंकज लोंढे,मुन्ना खाटीक,ॲड.राज बनसोडे, विजयराव शिंदे,भागवतराव आरणे, बाळासाहेब खाडे ,रावसाहेब बनसोडे,अनिलभाऊ गायकवाड, रावसाहेब निकाळे, सुधाकर बनसोडे, अमित वाघमारे, अरुण बनसोडे, प्रदीप खरात दादासाहेब त्रिभुवन विलास पाळंदे संतोष गायकवाड ,तुषार सदाफळ,बापू गायकवाड,अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधानच्या प्रतिकृती

असलेल्या शिल्पाच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात झालेल्या हिंचारात परभणी येथील संविधान प्रेमी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, सोमनाथ सर्वर्वशी यांच्या परिवारातील व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे व कुटुंबास शासकीय मदत मिळावी,

परभणी येथील निषेध मोर्चातील नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.देशाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अपमानकारक वक्त्यब्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी

मागून केंद्रीय गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.बीड जिल्ह्या

तील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करत त्यांची निघृण हत्या करण्यात आली, त्यांच्या हत्येतील आरोपीस तात्काळ अटक करून दोषीवर कठोर कार्यवाही व्हावी.महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या स्मारकात व परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात यावे आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button