Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
राजकीयशिर्डी

साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात!

शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) मंगलमय व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दि. १३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्यात पहिल्याच दिवशी सुमारे ८ हजारांहून अधिक पारायणार्थींनी सहभाग घेतला. यामध्ये ५ हजारांहून अधिक महिला आणि ३ हजारांहून अधिक पुरुष पारायणार्थींचा समावेश आहे.
सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी श्री साईबाबा समाधी मंदिरातून श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व श्रींच्या प्रतिमेची हनुमान मंदिर व द्वारकामाई मार्गे साईआश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्रभारी कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, तर गोरक्ष गाडीलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात पोहोचल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते श्री साईसच्चरित ग्रंथ व कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पुरुष पारायणार्थींकडून, तर दुपारी १ ते ५.३० या वेळेत महिला पारायणार्थींकडून श्री साईसच्चरिताचे वाचन करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्यामुळे साईनगरीत सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी


पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११.३० या वेळेत ब्राह्मण एकता मंच, शिर्डी यांच्यावतीने विष्णुसहस्रनाम पठण करण्यात आले.
दुपारी १ ते ३ या वेळेत श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर, शिर्डीच्या विद्यार्थीनींचा सांस्कृतिक कार्यक्रम, तर दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम गेट क्रमांक ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात पार पडला.


सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रा. श्री. सुनील कांडेकर सर यांचे श्री साई चरित्र ग्रंथ प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प. कु. ओंकार महाराज बोचरे (श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, निमगाव कोऱ्हाळे) यांचे कीर्तन होणार आहे.
श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याच्या निमित्ताने पुढील सात दिवस शिर्डीत धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाची अनुभूती साईभक्तांना मिळणार असून, या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button