Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

प्रसिद्ध उद्योगपती व साईभक्त नीता अंबानी यांचे साई दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमच्या मालकीण व रिलायन्स कं. च्या उद्योगपती नीता मुकेश अंबानी यांनी शिर्डीला येऊन श्री साईबाबांचे दर्शन मुंबई इंडियन ची आयपीएलची क्रिकेट मॅच ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या शिर्डीत होत्या त्यांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गुरुस्थान मंदिर लेंडी बागेतही त्यांनी जाऊन दर्शन घेतले दिवे लावले. विशेष म्हणजे या दिवशी मुंबई इंडियन्स ने क्रिकेट मॅच मागे आयपीएल क्रिकेट मॅच मध्ये मुंबई इंडियन्सची दिल्ली येथे मॅच असतानाही नीता अंबानी शिर्डीला आल्या होत्या त्या दिंडी बागेत ध्यानस्थ काही वेळ बसल्या होत्या त्यावेळेसही मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमने आयपीएल मधील त्या दिवशी ची मॅच जिंकली होती.

सध्या आयपीएलच्या 18 वा हंगाम सुरू आहे . मात्र मुंबई इंडियन्स अजूनही फॉर्ममध्ये दिसत नाही. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकावणाऱ्या रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले होते. हार्दिक या वर्षीही कर्णधार आहे. पण, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्सची मालक असलेले अंबानी कुटुंब आजकाल भक्तीत मग्न आहे. अलिकडेच, अनंत अंबानी यांनी त्यांची 170 किमी लांबीची पदयात्रा पूर्ण केली आणि द्वारकाधीश येथे प्रार्थना करत दर्शन घेतलं. आता नीता अंबानी देखील शिर्डीला पोहोचल्या, जिथे त्यांनी साईबाबांच्या दरबारात त्यांनी दर्शन घेतले.

नीता अंबानी रविवारी शिर्डीला साई दर्शनासाठी आल्या तेव्हा तिथल्या एका चाहत्याने रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची मागणी केली. नीता अंबानी या सुरक्षेच्या ताब्यामध्ये मंदिराकडून येत असताना साईभक्त, क्रिकेटच्या चहाते यांनी नीता अंबानींना पाहताच त्यापैकी एका क्रिकेट प्रेमींनी रोहित शर्माला कॅप्टन करा मॅडम असे म्हटले.


देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाच्या मालकीण नीता अंबानी रविवारी संध्याकाळी शिर्डीला पोहोचल्या. तिथे त्यांनी साईबाबांच्या दरबारात दर्शन घेतले. मुंबई इंडियन्सने सध्या आयपीएलमध्ये सहा पैकी चार सामने गमावले आहेत.

दरम्यान, नीता अंबानी यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात जाऊन येणाऱ्या काळात मुंबई इंडियन्स संघाच्या यशासाठी प्रार्थना केली. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नीता अंबानी मंदिरातून बाहेर पडत असताना, रोहित शर्माचा एक चाहता त्यांना भेटला. त्यांनी नीता अंबानीकडे “मॅडम, रोहितला कर्णधार बनवा” अशी मागणी केली.

नीता अंबानींनी हात जोडून उत्तर दिले – “बाबांची इच्छा.”आणि त्या तशाच सुरक्षेच्या ताब्यात पुढे गेल्या. नीता अंबानी या साईभक्त आहेत. त्या नेहमी शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतात. त्यांचा साई संस्थांनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button