Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

श्री महालक्ष्मी मंदिरात लाखोंची चोरी!सोन्या चांदीच्या दागिन्यासह सीसीटीव्हीचा डीव्हीआरचीही चोरी!

संगमनेर ( प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आज (9 मार्च) पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या 50 ते 60 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन किलो वजनाचा चांदीचा मुखवटा लंपास केला. चोरीचा एक धक्कादायक पैलू म्हणजे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील सोबत नेला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे पोलीस तपासासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
आज सकाळी मंदिराचे पुजारी नियमित पूजा करण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिरात आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर मंदिर प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाची टीम तपासासाठी दाखल झाली आहे. पोलिसांच्या तपासानुसार चोरट्यांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करून चोरी केली. चोरी झालेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे अंदाज आहे.

या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहाने यात्रा भरते. मात्र या मोठ्या देवस्थानाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही असूनही डीव्हीआर गायब केल्याने चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचल्याचे स्पष्ट होत आहे. सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी सोबत नेल्यामुळे पोलीस तपासासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button