Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरक्राईम

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी महंत रामगिरी महाराजांवर राहता येथे गुन्हा दाखल

सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या वक्तव्यातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे राहाता येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने  चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे 
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमुळे राहाता येथे मोठा तणाव निर्माण झाला राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमाव जमला होता. यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. . अचानक एवढा मोठा जमाव रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांना सगळा बंदोबस्त लावावा लागला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत  पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने  यांनी तातडीने या घटनेच्या संबंधित व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये, जे कोणी हे व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. कुणीही पोस्ट व्हायरल करू नये किंवा सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन  पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांन  केलं आहे. ह्या प्रकरणी महंत रामगिरी आहाराजांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र नागरिकांनी शांतता राखावी, अफवा पसरवणारे प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करु नयेत, तसेच गैरसमज करणारे संदेशही पाठवू नयेत, असे आवाहन  पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी केले आहे.व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढल्याने मुस्लिम समाजाचे आभार  पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी मानले ह्यावेळी मौलाना रफीक शाह,मौ.अल्ताफ शाह,मुश्ताक शाह, सलीम शाह, शफीक शाह, जमील शाह आसिफभाई चाऊस,इलियास शाह, आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button