Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील बॉम्बशोधक श्वानपथकातील वर्धन रिटायर!सेवानिवृत्तीनंतर शाल टाकून करण्यात आला सन्मान!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी हे श्री साईबाबां मूळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे दररोज हजारोच्या संख्येने व उत्सव काळात लाखोच्या संख्येने साईभक्त येत असतात .त्यामुळे येथे साई मंदिर व साई भक्तांची व ग्रामस्थांची सुरक्षा महत्त्वाची समजली जाते. त्यासाठी येथे सर्व सुरक्षा यंत्रणा सातत्याने सज्ज असते. अशाच सुरक्षेच्या ताब्यामध्ये बॉम्बशोधक पथकातील पोलीस यंत्रणेचा( डॉग) श्वान वर्धन येथे कार्यरत होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबा मंदिरासह मंदिर परिसरामध्ये पोलिस यंत्रणेमार्फत बॉम्ब शोध श्वानपथकामध्ये इनामेइतबारे साईसेवा देणारा व दररोज नित्यनेमाने आपल्या श्वासाने सुरक्षा तपासणी करणारा “वर्धन” आज आपल्या या शासकीय सेवेतून सेवा निवृत्त झाला आहे. वर्धन हा प्रशिक्षित असा बॉम्ब शोधक पथकातील श्वान आहे. तो बॉम्बशोधक पथकामध्ये पोलिसांबरोबर येथे काम करत होता.

अनेक दिवस त्याने साई मंदिर व परिसरात आपली चोख ड्युटी बजावली. मात्र तो आता आपल्या या ड्युटी तून रिटायर झाला आहे. वर्धन सेवानिवृत्त झाला त्यामुळे त्याचा शाल टाकून सत्कारही करण्यात आला.यावेळी
आजपासून आपण परत मंदिरात येऊ शकणार नाही. याचे दुःख वर्धनच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होते.
त्याचा नुकताच येथे सन्मान करण्यात आला.

त्यावेळी आपसुकच त्याचे डोळे भरून आले आणि त्याला आपल्या मित्राप्रमाणे ,पोरासारखं , आपल्या नातलगासारखं व आपल्या ड्युटीतील बरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे जपणारे या पथकातील पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याही डोळ्यात अश्रू काही क्षण आले होते. असा हा वर्धन श्वान या बॉम्ब शोध श्वानपथकातून सेवानिवृत्त झाला आहे. तो जरी सेवानिवृत्त झाला मात्र त्याची आठवण बॉम्ब शोध पथकातील पोलीस कर्मचारी तसेच शिर्डीतील साईभक्त, ग्रामस्थ यांनाही कायम नक्कीच राहील. असे बोलले जात होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button