Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे कालवातून आले पाणी!

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर राहता तालुक्यातील केलवड येथे निळवंडे कालव्याचे पाणी पोहचले असून शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला . सुमारे 53 वर्षानंतर निळवंडे कालव्यातून राहता तालुक्यातील केलवड येथे पाणी आल्यानंतर येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत पूजन करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांची भव्य अशी संवाद्य गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्वतः खासदार सदाशिव लोखंडे यांनी शेतकरी ग्रामस्थांबरोबर नृत्य करत आनंद साजरा केला. गेल्या अनेक वर्षापासून निळवंडे कालव्यात कधी पाणी येणार याची प्रतीक्षा होती ती आज पूर्णत्वास आली. त्यामुळे संपूर्ण केलवड तसेच संपूर्ण परिसर आज मोठा आनंदी, खुशी दिसून येत होता. आजच दिवाळी, दसरा सण शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी साजरा केला. हा संपूर्ण परिसर निळवंडे कालव्यामुळे बागायती होणार आहे. सधन होणार आहे. अनेकांनी निळवंडे धरणासाठी खासदार लोखंडे यांचे मोठे योगदान असून त्यांनाही धन्यवाद दिले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button