Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
अ.नगरक्राईम

राहुरीत दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई! शिर्डी-राहाता कनेक्शन उघड तीन आरोपी ताब्यात-एक फरार

राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत फिरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल सापळा रचून पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धाडसी कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी अजूनही फरार आहे.
⚠️ डिझेल चोरीनंतर मोठ्या दरोड्याचा कट?
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरकुटे, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे व चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🚔 गुप्त माहितीवरून मध्यरात्री सापळा१८ मे रोजी रात्री राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना कोल्हार-राहुरी मार्गावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित टोळी डिझेल चोरी करून पुढे दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गुहागाव परिसरात सापळा रचण्यात आला.
दरम्यान, संशयित स्विफ्ट कार दिसताच पोलिसांनी वाहन अडवून झडती घेतली. त्यामध्ये:
करण राजू उर्फ राजेंद्र साळुंखे (रा. नांदुरकी रोड, शिर्डी)
सनी उर्फ सल्या राजेंद्र पवार (रा. सावळी विहीर, ता. राहाता)
जितेंद्र रोहिदास वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता)


यांना ताब्यात घेण्यात आले.
🔥 चाकू, कटावणी, ड्रम… मोठ्या गुन्ह्याची तयारी?
या कारवाईत आरोपींकडून दोन मोबाईल, दोन लाखांची स्विफ्ट कार, ३५ लिटर डिझेल, चार रिकामे ड्रम, टॉर्च, लोखंडी कटावणी, चाकू व प्लास्टिक पाईप असा एकूण २ लाख १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान, निलेश मोकळ (रा. सावळी विहीर) हा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाणे येथे बीएनएस २०२३ च्या कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button