Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

शिर्डी ( प्रतिनिधी) रस्त्याने पायी जात असणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा मोबाईल काढून त्याला लुटण्यात आले व नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली. यासंदर्भात ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश सखाहरी चत्तर (वय ४२, हांडेवाडी, चासनळी, कोपरगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता झाले होते. राहता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना १३ जूनला दिला. बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला.

त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला.दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला. त्यानंतर या खुनाला खरी वाचा फुटली.गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना उसाच्या कांडक्याने व हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला.

मृतदेह उसाच्या शेतात मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला, पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांनी सांगितले. पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शिर्डी व परिसरात व्हाइटनर तसेच गांजा ,चरस ,अफू ,दारू आदी नशा करणारे तरुण मोठ्या प्रमाणात असून त्यात अल्पवयीन मुलांची संख्या वाढली आहे. नशेसाठी हे अल्पवयीन तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी अवैध व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे. असे सर्वसामान्य नागरिकां कडून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button