Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शिर्डी लोकसभा मतदारसंघ व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुका अतिशय शांततेत, निर्भयपणे, व नियोजनबध्द ,कुशलतेने पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत – पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रास्तविक व स्वागत पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकुलोल यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
सचिव सुनील साळवे यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे रेड क्रॉस सोसायटीला मिळालेले अष्टपैलू पदाधिकारी असून किरण सावंत – पाटील

यांचे नेतृत्वाखाली सर्व टीम जिल्ह्यात कार्य करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मोठा फायदा प्रशासनात होतो.कर्तृत्ववान पदाधिकारीमुळे रेड क्रॉसचे काम प्रगतीपथावर चालू आहे. रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत – पाटील उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे कामाची प्रशंसा वरिष्ठांकडून झाली याचा रेड क्रॉस सोसायटीला अभिमान असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले


सत्काराला उत्तर देताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ म्हणाले की, प्रांताधिकारी किरण सावंत – पाटील यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाल्याने खूप शिकण्यास मिळाले. रेड क्रॉसचे सेवाकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. या पुरस्काराने काम करण्याची दुप्पट प्रेरणा मिळेल असे सांगत मिलिंदकुमार वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.


अध्यक्षीय मनोगत व सत्काराला उत्तर देताना किरण सावंत – पाटील म्हणाले रेड क्रॉस चे अविरत सेवाकार्य प्रेरक आदर्श आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही निवडणुका शांततेत नियोजनपूर्वक पार पाडणेसाठी महसूल स्टाफ, निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असतो.


रेड क्रॉसचे कामाविषयी किरण सावंत – पाटील यांनी समाधान व्यक्त करत विविध कार्यक्रमचे वार्षिक नियोजन बनवण्याचे सूचित केले. भविष्यात गरजू नागरिकांपर्यंत विविध सुविधा रेड क्रॉस उपक्रमांद्वारे पोहोचविण्याचे कार्य सदस्यांनी करावे असे आवाहनही सावंत यांनी केले. आमचा केलेला सन्मान हा नवसंजीवनी देणाराच असेल त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे किरण सावंत – पाटील यांनी सांगितले


प्रवीणकुमार साळवे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी भरत कुंकुळोल ,श्रावण भोसले, सुरेश वाघुले, पोपटराव शेळके, सचिन चंदन,संदीप छाजेड, गणेश थोरात,अरुण कटारे,केशव धायगुडे,बन्सी फेरवानी,विनोद हिंग्निकर, प्रवीण साळवे,श्रीकांत दहिमिवाल,डॉ.स्वप्नील पूर्णाले, बदर शेख,ज्ञानदेव माळी, शिवाजी गोरे,

अवधूत कुलकर्णी,साहेबराव रक्टे, मायाताई चाबुकस्वार, पुष्पाताई शिंदे,सुभाष बोधक, मधुकर वेडे,सोमनाथ जगताप आदी आजीव सभासद उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button