Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे साई आश्रम नंबर दोन इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली

शिर्डी प्रतिनिधी/ : श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट . सोसायटी शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री साईबाबा संस्थान शिर वातावरणात पार पडली.

sai nirman
जाहिरात

उपस्थित सभासदांचे संचालक श्री रविंद्र बाबु गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अध्यक्षपदाची सुचना मांडली त्यास संचालक श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा. यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पा. यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारले. सभेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता. विषय पत्रिकेप्रमाणे विषयांचे वाचन संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पा. यांनी केले सर्व विषयवार साधक बाधक चर्चा होवुन सर्व विषय बहुमताने मंजुर करण्यात आले.

सभेचे अध्यक्ष श्री विठ्ठल तुकाराम पवार पा. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनात संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मा. न्यायमुर्ती श्री सुधाकरजी यार्लगड्डा साहेब, जिल्हाधिकारी मा.श्री सिध्दाराम सालीमठ साहेब (भा.प्र.से.) तदर्थ समिती सदस्य तसेच मा. श्री गोरक्ष गाडीलकर साहेब (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मा.श्री तुकारामजी हुलवळे साहेब, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सर्व प्रशासकिय अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, सर्व विभाग प्रमुख त्याच प्रमाणे सर्व सभासदांचे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

DN SPORTS

सभेत सभासदांच्या हिताचे व संस्थेच्या हितांच्या अनेक विषयांवर चर्चा झाली. संस्थेच्या इतिहासात तब्बल एकुण २० विषयांवर चर्चा झाली. त्यात अनेक मान्यवर सभासदांनी भाग घेतला त्यास दीपावली शिधा वाटप, मकर संक्रांत वाणवस्तु वाटप, मराठी नुतन वर्ष गुढीपाडवा शिधा वाटप, तसेच संस्थेस शिर्डी शहाराचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामासह जागा खरेदी करण्याचा विषयही बहुमताने मंजुर झाला. परंतु संस्थेचे अद्यावत नुतन कार्यालय उभारण्यास सभासद श्री प्रतापराव कोते, श्री वाल्मीक धरम, श्री विजय डांगे, श्री रविंद्र चौधरी, श्री पांडुरंग धुमसे यांनी विरोध दर्शविला तर उर्वरीत सर्व सभासदांनी बहुमताने शिर्डी शहराचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामासह जागा खरेदी करुन संस्थेचे अद्यावत कार्यालय उभारण्यास मंजुरी दिली. या प्रसंगी सन २०२३-२४ करीता सभासदांचे शेअर्स वर १५% डिव्हीडंड देण्यास तसेच सभासद ठेवीवर द.सा.द.शे.९% प्रमाणे व्याज देण्यास सर्वानुमते मान्यता दिली तर संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पा. यांचे संकल्पनेतुन जामीनदार मुक्तीबाबत पहिले पाऊल म्हणुन सर्व सभासदांचा नैसर्गिक मृत्युचा विमा उतरविण्यात येवून होणाऱ्या विमा हप्त्यापैकी ५०% विमा हप्ता सभासदांनी तर उर्वरीत ५०% हप्ता संस्थेने भरण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. त्याच प्रमाणे सर्व सभासद व कर्मचारी यांना दीपावली-२४ निमीत्त ५० किलो साखर, ५ लिटर गोडतेल, २ किलो मिठाई व सप्रेमभेट वस्तु देण्यास या सभेने मान्यता दिली.

सभेस संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पा., व्हा. चेअरमन श्री पोपटराव भास्करराव कोते पा., संचालक श्री महादु बापुसाहेब कांदळकर, श्री कृष्णा नाथा आरणे, श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., श्री संभाजी शिवाजी तुरकणे पा., श्री देविदास विश्वनाथ जगताप, श्री विनोद गोवर्धन कोते पा., श्री मिलींद यशवंत दुनबळे, श्री तुळशिराम रावसाहेब पवार पा., श्री रविंद्र बाबु गायकवाड, श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., श्री इकबाल फकिरमहंमद तांबोळी, श्री गणेश अशोक आहिरे, सौ. सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., श्री रंभाजी काशिनाथ गागरे, श्री भाऊसाहेब भानुदास लबडे पा. (तज्ञ संचालक) सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पा., सह. सचिव श्री विलास गोरक्षनाथ वाणी तसेच मोठा सभासद वर्ग उपस्थित होता.

सभेच्या शेवटी संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पा. यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल उपस्थित सभासदांचे आभार मानले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button