Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून 18 वर्षांनी सुटका

अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळी यांची सुटका केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातुन सुटका झाली.

कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी जामिनावर नागपूरच्या मध्यवर्ती तुरुगातून बाहेर आला आहे. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळी याला नागपूरच्या डॅा बाबासाहेब आंबेडकर विमानतळ पर्यंत आणले. आता अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना होईल.

मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला होता.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील १८ वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी-शर्ती सत्र न्यायालय निश्चित करेल असे स्पष्ट केले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button