Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरराजकीय

एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार या विमानात 242 प्रवासी होते. रिपोर्टनुसार, विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते. 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. विमान जेथे कोसळले तो एक निवासी भाग होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विजय रुपाणी हे 2016 ते 2021 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014 ते 2016 या कालावधीत ते कॅबिनेट मंत्री होते. 2006 ते 2012 या कालावधीत रुपाणी हे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 1996 ते 1997 मध्ये ते राजकोटचे महापौर होते.टेकऑफ करताना एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले आहे.

विमान दुर्घटना ही इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झालेल्या परिसरात अग्निशामक दलाच्या पाच गाड्या पोहचल्या असून तेथे आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.या दुर्घटनेनंतर पीएम मोदी आणि अमित शाह हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल यांच्याशी या दुर्घटनेसंबंधी चर्चा केली असून त्यांनी राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतात, मृत्यू किंवा दुखापत झाल्यास विमान कंपन्यांचे दायित्व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांद्वारे नियंत्रित केले जाते जसे की मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन, 1999, ज्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत, विमान कंपन्या खालीलप्रमाणे भरपाई करण्यास जबाबदार आहेदोष काहीही असो, मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास प्रति प्रवाशासाठी 128,821 विशेष ड्रॉइंग राइट्स (SDRs) (सुमारे 1.4 कोटी रुपये) पर्यंत.


त्याचवेळी, विमान कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मर्यादेपेक्षा जास्त भरपाई देखील द्यावी लागू शकते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button