Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरशिर्डी

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी धार्मिक कार्यक्रम पार पडले श्रीच्या रथाची गावात वाजतगाजत मिरवणूक  

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मुंबईसह राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानच्‍या अध्‍यक्षा तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्‍के) यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा व उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व अधिक्षक सामान्‍य प्रशासन रामदास कोकणे यांनी फोटो घेवून सहभाग घेतला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान झाले. दर्शन व कावडी मिरवणूक झाली व सकाळी ०७.३० वाजता श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानच्‍या अध्‍यक्षा तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती प्रेमानंद सोनटक्‍के यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ८.०० वाजता संस्‍थानच्‍या अध्‍यक्षा तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती प्रेमानंद सोनटक्‍के तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी वंदना गाडीलकर यांचे हस्‍ते श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला तसेच सकाळी ८.३० वाजता द्वारकामाईतील बदलण्‍यात येणा-या गव्‍हाच्‍या पोत्‍याचे विधीवत पुजन करुन गव्‍हाचे पोते बदलण्‍यात आले.
सकाळी १०.०० ते १२.०० वाजता मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे श्रीराम जन्‍मोत्‍सव कीर्तन झाले. त्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी वंदना गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी विश्‍वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त यांच्‍या उपस्थितीत श्रीराम जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती संपन्‍न झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. अलोक मिश्रा, साईआस फाऊंडेशन, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्री. विजय गुजर, मुंबई याचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०४.०० वा. निशाणाची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती, सायं. ०७.०० ते १०.०० यावेळेत श्री. मनहरजी उधास, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले राहणार आहे.
उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सोमवार, दिनांक ०७ एप्रिल रोजी पहाटे ०६.०० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्‍थान मंदिर येथे रुद्राभिषेक सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्‍याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी १२.१० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत द गोल्‍डन व्‍हॉईस स्‍टुडीओज, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्रीम. पुजा राठोर, जयपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.०० ते ०९.३० वा. यावेळेत मिराज इव्‍हेंटस्, मुंबई यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button