Letest News
साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास!
क्राईमशिर्डी

बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्डीत गुन्हा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील ‘साई मल्हार’ हॉटेल प्रकरणात तब्बल ₹2 कोटी 11 लाखांच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी चार महिलांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाईला अडथळा आणत शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर हेमंत विलास अमृते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर क्रमांक 0631/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 221 व 223(अ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादीनुसार, शोभना भाऊसाहेब बनकर, प्रिती उर्फ सुरेखा प्रसाद बनकर, गीती उर्फ सीमा सचिन बनकर यांनी 2018 मध्ये आयडीबीआय बँकेच्या शिर्डी शाखेतून घेतलेल्या मॉर्गेज कर्जाची ₹2.11 कोटींसह व्याजाची थकबाकी भरली नव्हती. वारंवार नोटिसा देऊनही कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने संबंधित मालमत्तेचा ताबा मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राहाता तहसीलदारांनी 17 जुलै रोजी ताबा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयडीबीआय बँकेचे अधिकारी, महसूल अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत पानमळा येथील ‘साई मल्हार’ हॉटेल येथे कारवाई करण्यात आली. हॉटेलमधील खोल्या सील करण्याची प्रक्रिया सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये संबंधित महिला व लहान मुले उपस्थित होती.


अधिकाऱ्यांनी न्यायालयीन व प्रशासकीय आदेश समजावून सांगून सकाळी 11.45 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ताबा देण्याची वारंवार विनंती केली. मात्र, “आम्ही ताबा देणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही बाहेर येणार नाही,” अशी भूमिका घेत महिलांनी कारवाईला विरोध केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याचवेळी दीपाली भाऊसाहेब बनकर उर्फ दीपाली अमृत क्षीरसागर यांनीही वारंवार कारवाईच्या ठिकाणी हस्तक्षेप करत मोबाईलवर चित्रीकरण केले आणि अधिकाऱ्यांशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या घटनेनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संबंधित चार महिलांविरुद्ध शासकीय आदेशाचे उल्लंघन व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
चौकट : प्रकरण एका नजरेत
थकीत कर्ज : ₹2.11 कोटी (व्याजासह)
मालमत्ता : साई मल्हार हॉटेल, पानमळा, शिर्डी
कारवाई : जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशानुसार ताबा प्रक्रिया
गुन्हा : शासकीय कामात अडथळा, आदेशाचे उल्लंघन
पोलीस ठाणे : शिर्डी
एफआयआर : 0631/2026

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button