Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
क्राईमशिर्डी

मी पोलीस आहे मी सीबीआयचा अधिकारी आहे असे सांगून लोकांना गंडवणार्याला शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने केले गजाआड 

Shirdi police thrash man who scammed people by saying 'I am a policeman, I am a CBI officer'

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डी येथील 500 रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक गलांडे यांनी व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी तात्काळ रवाना झाले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आणि सदर जो व्यक्ती होता त्याच्याकडे पोलीस पोहोचतात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळेस पोलीसांनी त्याला मोठया शीताफिने ताब्यात घेतले आणि यानंतर पोलीसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनेक गुन्हे केल्याचे उघड केले आहे सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणार असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वय वर्ष 30 असे आहे

आरोपीची इतर माहिती काढली असता त्यावर जवळपास 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून त्याच्यापेक्षा अधिक गुन्हा दाखल असण्याची देखील दाट शक्यता आहे ह्या आरोपीची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडे काही बनावट कागदपत्रे देखील मिळवून आलेले आहेत

बनावट आय कार्ड वरती त्याने त्याचे स्वतचा फोटो लावलेला आहे आणि नाव अशोक पाटील असे दाखवलेले आहे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलिस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशनला एकूण दोन गुन्हे त्यावर दाखल आहेत

ह्या आरोपीची गुन्हा करण्याची पद्धती अशी होती कि मी पोलीस आहे किंवा मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि सध्या युद्ध सुरु आहे त्यामुळे तपासणी चालू आहे तर तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्या खिश्यात काही ठेवलेले आहे का ते मला बघायचं आहे ह्या आरोपी वर जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप ठिकाणी गुन्हे दाखल आहेत

लोक त्यावर विश्वास ठेवण्याचे त्या विश्वासाचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडे सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेला असायचे तो समोरच्यांना द्यायचा याच्यामध्ये आणखी त्याच्या कोणी जोडेदार आहेत का याचा देखील पोलीस तपास करत आहेत शिडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे

किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्या विभागाचा अधिकार आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्या संशयास्पद कोणी अडवून आल्यास तत्काळ आपण संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या भागात आपण राहत असाल तेथील पोलीस स्टेशन संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये

कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवत असे अशी कोणाची देखील फसवणूक झालेले असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा फसवणुक प्रकारे पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडीदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असेल तर आपण त्या आरोपीवर देखील कारवाई करू

असे शिर्डीचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी सांगितले पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे पो.ना.पवार पो ना गोमसाळे पो ना बिरदवडे पो ना राजपूत पो ना खुडे शिर्डी पोलीस तपास करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button