Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

शिर्डीतील सेवाधाऱ्यांची आरोग्यासाठी हाक-श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालयात मोफत उपचारांची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) – श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विविध सेवा प्रकल्पांत कार्यरत असलेल्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना संस्थानच्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत, अशी भावनिक व ठाम मागणी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन सादर केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संस्थानमध्ये दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात. त्यांच्या सेवेसाठी संस्थानच्या आवारात मोबाईल कॅमेरा क्लोकरूम, चप्पल स्टँड, प्रसादालय तसेच विविध स्टॉल्स रात्रंदिवस सुरू असतात. या सर्व सेवांमध्ये साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी अत्यंत अल्प वेतनात प्रामाणिकपणे काम बजावत आहेत.


मात्र या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हक्काची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आजारपणाच्या प्रसंगी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खासगी रुग्णालयातील वाढत्या उपचारखर्चामुळे अनेक वेळा कर्ज काढण्याची वेळ येते. “आम्ही साईबाबांचा एक भाग म्हणून भक्तांची सेवा करत आहोत. परंतु आमच्या अल्प पगारात महागडे उपचार करणे अशक्य आहे. प्रशासनाने आम्हाला केवळ कामगार न समजता ‘साई परिवाराचा’ सदस्य म्हणून मान्यता देऊन वैद्यकीय सुविधा द्याव्यात,” अशी भावना चेअरमन विठ्ठल पवार यांनी व्यक्त केली.


यावेळी सचिव विलास वाणी, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, व्यथित कर्मचारी रमेश वाघे म्हणाले, “दिवसभर हजारो भक्तांना सेवा देणारे आम्हीच, आज स्वतःच्या उपचारांसाठी प्रशासनाकडे हात जोडत आहोत. घरखर्च सांभाळताना एखादा मोठा आजार उद्भवला की खासगी रुग्णालयाचे बिल भरताना आमचे कंबरडे मोडते.”


कर्मचाऱ्यांच्या कार्याची व त्यांच्या व्यथेची दखल घेऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माणुसकीच्या नात्याने वैद्यकीय कवच उपलब्ध करून द्यावे, अशी एकमुखी मागणी होत आहे. “साईंच्या दरबारात कोणीही उपाशी राहत नाही, तसेच रात्रंदिवस सेवा करणाऱ्या या सेवाधाऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न तातडीने सोडवावा,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button