Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरक्राईम

घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मोबाईल- पत्ते व वाहने जप्त

घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा; स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम, मोबाईल, पत्ते व वाहने जप्त
राहाता | प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे अनेक दिवसांपासून उघडपणे सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने घणाघाती कारवाई करत १३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. घरासमोरच पत्र्याच्या शेडमध्ये हारजीतीचा जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी थेट धाड टाकून संपूर्ण अड्डाच उद्ध्वस्त केला.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पंचांसह घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन ठिकाणी गोलाकार बसून पैशांवर ‘तिरट’ जुगार खेळणाऱ्या १३ जणांना रंगेहात पकडले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


चौकशीदरम्यान भागवत किसन त्रिभुवन यानेच हा जुगार अड्डा चालवत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराचे पत्ते, मोबाईल फोन तसेच वाहने जप्त करण्यात आली. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईतील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
अशोक तुकाराम सोनवणे (वय 43) – रा. अस्तगाव, ता. राहाता
अंज्याबापू किसन त्रिभुवन (वय 50) – रा. अस्तगाव, ता. राहाता
संजय शिवराम जेजुरकर (वय 50) – रा. अस्तगाव, ता. राहाता
निसार कादरभाई शेख (वय 64) – रा. अस्तगाव, ता. राहाता
भागवत किसन त्रिभुवन (वय 55) – रा. अस्तगाव, ता. राहाता (जुगार अड्डा चालविल्याचा आरोप)
उस्मान इब्राहिम पठाण (वय 40) – रा. बाभळेश्वर, ता. राहाता
लक्ष्मण गोविंद आण्णा गायकवाड (वय 36) – रा. श्रीरामपूर
अरुण साहेबराव वर्षे (वय 50) – रा. मोरवाडी, ता. राहाता
मुन्नावर इब्राहिम शेख (वय 38) – रा. बाभळेश्वर, ता. राहाता
राजेंद्र किसन पोटे (वय 50) – रा. लोणी, ता. राहाता
गोकुळ सोन्याबापू गाडेकर (वय 40) – रा. राहाता
सोपान बबन लहामगे (वय 51) – रा. यादवमळा, राजुरी, ता. राहाता
संजय कचरू राऊत (वय 51) – रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर.

या कारवाईमुळे राहाता तालुक्यात अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अस्तगावात एवढ्या बिनधास्तपणे जुगार सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची कल्पना नव्हती का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता या अड्ड्याशी संबंधित आर्थिक साखळी, आश्रयदाते आणि इतर जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी अशीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button