Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरशिर्डी

शिर्डी जवळील निमगाव येथील प्रसिद्ध श्री खंडोबा महाराजांची चंपाषष्ठी निमित्त यात्रा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी नजीक असलेल्या निमगाव -कोऱ्हाळे येथील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त आयोजित श्री साईसतचरित्र पारायण व किर्तन महोत्सवाची आणि येथील यात्रेची मोठ्या उत्साहात नुकतीच सांगता झाली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे प्रसिद्ध पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत असतो .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावर्षीही चंपाषष्ठी निमित्त येथे श्री साईसत चरित्र पारायण व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दररोज सकाळी काकड आरती व सात दिवस सकाळी सात ते अकरा या कालावधीत श्री साई चरित्र पारायण अध्याय वाचन होत होते. सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत होता.

राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील
या खंडोबा मंदिरात अधून मधून साईबाबा सुद्धा येत होते. असा उल्लेख आढळतो. असे हे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला आहे व भव्य दिव्य असे आकर्षक नवीन मंदिर बनवण्यात आले आहे. या मंदिर व परिसरात चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

चंपाषष्ठीला शनिवारी सात डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा ते दीड या कालावधीत काल्याचे किर्तन होऊन वांग्याची भाजी व भाकरीचा, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी श्री साई चरित्र पारायणाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. ग्रंथ मिरवणूक ही गावातून काढण्यात आली होती. चंपाषष्ठी या दिवशी येथे मोठी यात्रा भरली होती . मंदिरासमोर अनेक हार प्रसाद मिठाई खेळणी आदींची दुकाने थाटली होती. तसेच चंपाषष्ठी च्या दिवशी अनेकांनी भाकरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद घेतला.

अनेक भाविक मंदिरामध्ये श्री खंडोबाची तळी भरताना दिसत होते, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळण्यात येत होता. चंपाषष्ठी च्या दिवशी हजारो भाविकांनी येथे येऊन मनोभावे श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले.

येथे चंपाषष्ठी निमित्त आयोजित श्री साईसतचरित्र पारायण, कीर्तन महोत्सव तसेच यात्रा व महाप्रसाद आदी
सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न व्हावे यासाठी श्री खंडोबा महाराज देवस्थान ,विश्वस्त तसेच निमगाव‌ ग्रामस्थ ,खंडोबा भक्त ,भाविक यासाठी परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button