Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
क्राईमशिर्डी

शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीत दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘झिंग्या गँग’ने मध्यरात्री एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या रोहित सुरेश आव्हाड उर्फ गुड्ड्या (वय 26, रा. शिर्डी) याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत रस्त्यावरील सिमेंट ब्लॉकने थेट डोळे व तोंडावर वार करण्यात आले. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार सुरू आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🕚 हॉटेलसमोर भांडण, पुढे गँगवॉर
दि. 07 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 ते 11.45 च्या सुमारास हॉटेल दैविक समोर सय्यद बिर्याणी जवळ आदित्य कराळे व ऋषी पारधे यांच्यात भांडण सुरू होते. ते भांडण सोडवण्यासाठी रोहित व त्याचा मित्र अरबाज खान गेले असता, ऋषी पारधे याने दमबाजी करत “मध्येमध्ये पडू नका” असे म्हणत धक्काबुक्की सुरू केली.


📞 फोनवरून बोलावली ‘झिंग्या गँग’
क्षणातच ऋषी पारधे याने झिंग्या उर्फ अनिकेत शेजवळ याला फोन केला. काही वेळातच
1) झिंग्या उर्फ अनिकेत सुनिल शेजवळ
2) अविनाश भाडाईत
3) आदि विनोद शेजवळ
4) सलमान
आणि इतर 4-5 जण
मोटारसायकलवर घटनास्थळी दाखल झाले.

🧱 “आज याला मारून टाकू” म्हणत सिमेंट ब्लॉकने हल्ला
“झिंग्या बॉईजच्या माणसाला नडतो काय?” असे म्हणत सर्वांनी मिळून रोहितला लाथाबुक्यांनी मारहाण केली. पुढे झिंग्या शेजवळ व ऋषी पारधे यांनी रस्त्यावरील सिमेंट ब्लॉक उचलून रोहितच्या तोंडावर व डोळ्यांवर जोरदार वार केले. रोहित वाचवाच असा आक्रोश करत असताना, परिसरातील नागरिक झिंग्याच्या दहशतीमुळे पळ काढत होते.


🤕 मित्राला वाचवताना अरबाजलाही मारहाण
रोहितला सोडवण्यासाठी मित्र अरबाज खान पुढे आला असता, त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. अखेर लोकांची गर्दी वाढू लागल्याने आरोपी फरार झाले.


🚨 शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 0101/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 109(1), 189(2), 189(3), 190, 191(2), 115(2) ही गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
❓ प्रश्न कायम : ‘झिंग्या गँग’ची दहशत कधी संपणार?
शिर्डी परिसरात खुलेआम दहशत माजवणाऱ्या टोळ्यांवर पोलीस कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

साईबाबांच्या नगरीत दहशत माजवणाऱ्यांना अजिबात क्षमा नाही.
कायद्याचा धाक दाखवून अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त केला जाईल.
शिर्डीची शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणारच.”
— रणजित गलांडे,
पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस ठाणे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button