Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक

शिर्डी | प्रतिनिधी :
साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या श्री साईचरित्र पारायण सोहळ्याची आज भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. पारायणातील अखेरचा अध्याय भक्तिभावाने वाचून श्री साईचरित्र पारायण सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली.
साईचरित्राच्या प्रत्येक अध्यायातून मिळणारा श्रद्धा, सबुरी, सेवा आणि मानवतेचा संदेश मनात साठवत हजारो साईभक्तांनी या पारायण सोहळ्यात सहभाग घेतला. पारायणाच्या दिवसांमध्ये शिर्डी नगरीत निर्माण झालेले भक्तिमय वातावरण आज सांगतेच्या दिवशी अधिकच भावपूर्ण झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सायंकाळी पोथीची भव्य मिरवणूक
पारायणाची सांगता झाल्यानंतर आज सायंकाळी श्री साईबाबांच्या पवित्र पोथीची शिर्डी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. साईनामाचा जयघोष, भजन-कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शिर्डी नगरी साईमय होणार आहे.
श्री साईबाबा संस्थान नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीत मोठ्या संख्येने साईभक्त, ग्रामस्थ, महिला, युवक आणि भाविक सहभागी होणार असून, भक्तिमय वातावरणात पोथीचे पूजन व दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, “सबका मालिक एक”चा संदेश देत आणि साईनामाचा जयघोष करत ही मिरवणूक शिर्डीच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.


शिर्डी नगरी आज साईनामाने दुमदुमणार!
पारायणाची सांगता आणि पोथीची भव्य मिरवणूक हा साईभक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक क्षण असणार आहे. अध्याय संपला असला तरी साईचरित्रातून मिळालेला श्रद्धा व सबुरीचा संदेश प्रत्येकाच्या मनात कायम राहणार आहे.
आज सायंकाळी निघणाऱ्या या भव्य मिरवणुकीत शिर्डीकरांसह देश-विदेशातून आलेल्या साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या भक्तिमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
साईनामाच्या जयघोषाने आज पुन्हा एकदा शिर्डी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button