Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरक्राईम

crime news # पोलीसांनीच पोलिसांवर गुन्हा दाखल राहाता बसस्थानक मारहाण प्रकरणात

राहाता | प्रतिनिधी
राहाता येथील बसस्थानकात एसटी बस घेऊन आलेल्या चालक व वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाणे येथे येवला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या हेडकॉन्स्टेबलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनतेचे रक्षक समजल्या जाणाऱ्या पोलिसाकडूनच अशी वर्तणूक झाल्याने पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याची तीव्र चर्चा नागरिक व पोलीस वर्तुळात सुरू आहे.






















🚌 शासकीय कर्तव्यात अडथळा; बसस्थानकात दहशत
फिर्यादी एसटी वाहक बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास बालाजी मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार दि. १ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एसटी बस (क्र. MH 24 AU 7970) राहाता बसस्थानकात आल्यानंतर वाद उफाळला.
येवला पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात, सार्थक संजय बनसोडे व त्यांच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करत चालक-वाहकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

























⚠️ “मी पोलीस आहे…” म्हणत दमदाटी
फिर्यादीनुसार, आरोपी हेडकॉन्स्टेबलने केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर स्थानिक पोलिसांनाही दमदाटी केली.
“मी पोलीस आहे, तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व ठाणे अंमलदार बर्डे यांनाही कामाला लावून टाकेल, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी दिल्याचे नमूद आहे.
कायद्याचा रक्षकच कायद्याला आव्हान देतोय का? — असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
























⚖️ गुन्हा दाखल; कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणी शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 132, 121(1), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि कुमावत करत आहेत.
घटनेनंतर एसटी कर्मचारी व नागरिकांकडून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबन व विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
👉 “जनतेचे रक्षण करणाऱ्यांकडूनच अशी गुंडगिरी?” — राहाता शहरात संताप उसळला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button