Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
अ.नगरक्राईम

रामवाडी रक्तरंजित! तरुणावर चाकू-कत्तीने जीवघेणा हल्ला

कोपरगाव थरारलं! रामवाडीत प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून
कोपरगाव शहरातील रामवाडी परिसरात १ मार्चच्या रात्री घडलेल्या भीषण खूनप्रकरणाने शहर हादरून गेले आहे. हनुमान मंदिरासमोर रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ३३ वर्षीय नवनाथ माधव कानफाटे यांची दगड, वीट आणि लोखंडी कत्तीने निर्दयी मारहाण करून हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत नवनाथ आढळून आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फोनवरून बोलावून रचला सापळा
या प्रकरणी मृताचा भाऊ समाधान माधव कानफाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, नवनाथ यांचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींकडून यापूर्वीही त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या.
घटनेच्या रात्री आरोपींनी नवनाथला फोन करून हनुमान मंदिरासमोर बोलावले. “तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस?” असा जाब विचारत त्याला दमदाटी करण्यात आली. आधीच रागाच्या भरात असलेल्या आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


लोखंडी कत्ती, वीट-दगडांनी सपासप वार
नवनाथ घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. लोखंडी कत्तीने वार करताना वीट आणि दगडांनी त्याच्या डोक्यावर सपासप प्रहार करण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे तो जागीच कोसळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला अत्यंत क्रूर आणि थरारक होता. डोक्यावर झालेल्या जबर मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.


पोलिसांची झटपट कारवाई; चारही आरोपी गजाआड
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले तसेच फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले.


करण सुदाम मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोटे (रा. रामवाडी) आणि रोहित दयानंद पवार (रा. वारी) या चौघांना पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शहरात तणावाचे वातावरण


या घटनेनंतर रामवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. प्रेमसंबंधाच्या संशयातून एवढ्या क्रूर पद्धतीने खून केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कोपरगाव शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या निर्घृण हत्येने शहर हादरून गेले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button