Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग

शिर्डी/अहिल्यानगर प्रतिनिधी :
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी जालिंदर बोरुडे (रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास यंत्रणांसमोर आता अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. जालिंदर बोरुडे याने नेमक्या किती गर्भवती महिलांची बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी केली? तो स्वतः डॉक्टर नसताना सोनोग्राफी मशीन कसे वापरत होता? या रॅकेटमध्ये आणखी कोणते डॉक्टर, एजंट किंवा इतर व्यक्ती सहभागी आहेत? या सर्व बाबींचा तपास पोलीसांकडून करण्यात येणार आहे.
सोनोग्राफी मशीन फिरते, रॅकेट राज्यभर पसरल्याची शक्यता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आलेले सोनोग्राफी मशीन घेऊन आरोपी विविध ठिकाणी जाऊन गर्भलिंगनिदान चाचण्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये विविध भागांतील एजंट, काही डॉक्टर तसेच मेडिकल व्यवसायाशी संबंधित व्यक्ती गर्भवती महिलांना आरोपींचे संपर्क क्रमांक आणि पत्ते उपलब्ध करून देत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.


आणखी संशयित रडारवर
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही संशयित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या सर्वांची चौकशी करून त्यांच्याविरोधातही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दीड महिन्यानंतरही एकालाही जामीन नाही
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही. तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने पुरावे गोळा करत असून प्रत्येक आरोपीविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपींना जामीन मिळू शकलेला नाही.
लिंगनिदान रॅकेटमागील मोठे मास्टरमाईंड कोण?
आतापर्यंतच्या तपासात डॉक्टर, एजंट, मेडिकल व्यावसायिक आणि सोनोग्राफी मशीन पुरवठादार यांचे जाळे समोर येत आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कोण आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून आगामी तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button