Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

“भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरींचा शिर्डीत स्फोटक इशारा

शिर्डी | प्रतिनिधी
भोंदूगिरीच्या आडून महिलांचे शोषण, अश्लील व्हिडिओ आणि अघोरी कृत्यांचा थरारक उलगडा… कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांपासून उच्चभ्रूंपर्यंत अनेकांवर संशयाची सुई रोखत खळबळजनक वक्तव्य केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

🔥 “हा फक्त बाबा नाही… मोठं रॅकेट आहे!”
मिटकरींचा थेट आरोप — खरात हा केवळ भोंदू बाबा नसून एक मोठं जाळं (रॅकेट) चालवत होता. महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ, अघोरी पूजा आणि पैशांचा खेळ… यामागे प्रभावशाली लोकांचे संरक्षण असू शकते, असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला.
⚡ मुख्यमंत्र्यांना सलाम… पण तपास खोलात हवा!
एकनाथ शिंदे यांनी वेळीच कारवाई करत आरोपीला अटक केली, याचं स्वागत करताना मिटकरी म्हणाले —
“फक्त अटक पुरेशी नाही… या प्रकरणाची मुळं उपटली पाहिजेत!”


🩸 अघोरी पूजांचा थरार – “रक्ताभिषेक ते गुप्त विधी”
मिटकरींनी उघड केलं की, खरातच्या आश्रमात करंगळी कापून रक्ताभिषेक, अमावस्या-शिवरात्रीला अघोरी विधी असे प्रकार घडत होते.
हे केवळ अंधश्रद्धा नसून “भयावह कटकारस्थान” असू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला.
✈️ “अजित दादांचा विमान अपघात… योगायोग की कट?”
सगळ्यात मोठा बॉम्ब टाकत मिटकरी म्हणाले —
अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही!
“या बाबाचे त्या घटनेशी धागेदोरे आहेत का, हे SIT ने उघड करायलाच हवं,” अशी थेट मागणी त्यांनी केली.


🏛️ विधानपरिषदेत धुमसणार वादळ
महाराष्ट्र विधान परिषद अधिवेशनात हा मुद्दा पेटणार असल्याचे संकेत देत मिटकरी म्हणाले —
“जर हा विषय दाबण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही!”


📢 “संत परंपरेला डाग… दोषींना सोडणार नाही!”
“महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळिमा फासणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मोठे मासे असले तरी ते बाहेर काढू,” असा इशारा देत मिटकरींनी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button