Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
राजकीयशिर्डी

ब्रेकिंग : शिर्डी नगर परिषदेच्या मतमोजणीला जोरदार सुरुवात-प्रशासन ‘हाय अलर्ट’ मोडवर

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला अधिकृत सुरुवात झाली असून, संपूर्ण शिर्डी शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्याची उत्सुकतेने प्रतीक्षा होती, त्या निकालाचा आज फैसला होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतमोजणी केंद्रावर पहाटेपासूनच प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मतमोजणी केंद्र अभेद्य किल्ला; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
मतमोजणी केंद्र परिसराला पूर्णपणे ‘सुरक्षा कवच’ देण्यात आले असून, प्रवेशद्वारांवर कडक तपासणी सुरू आहे. ओळखपत्र तपासणीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथके, राखीव पोलीस फोर्स आणि आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. परिसरात जमावबंदी लागू असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

प्रत्येक फेरीत धडधड; उमेदवारांची वाढती अस्वस्थता
मतमोजणी सुरू होताच उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. प्रत्येक फेरीचा निकाल हा राजकीय भवितव्य ठरवणारा असल्याने उमेदवारांच्या छातीत धडधड वाढली आहे. काही उमेदवार मतमोजणी केंद्राबाहेरच तळ ठोकून बसले असून, तर काही जण मोबाईल, व्हॉट्सॲप कॉल आणि लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. आघाडी-पिछाडीचे चित्र सतत बदलत असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि तणाव; विजयाच्या घोषणा की शांततेची वाट?
मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे समर्थक जमले असून, कुठे जल्लोषाची तयारी तर कुठे शांततेत निकालाची वाट पाहण्याची भूमिका दिसून येत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या विजय मिरवणुकीवर सध्या नियंत्रण ठेवले असून, निकाल अधिकृतरीत्या जाहीर होईपर्यंत संयम राखण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
धारधार : शिर्डीकरांचा श्वास रोखलेला; शहराच्या भवितव्याचा आज फैसला
शिर्डी शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाचा एकच प्रश्न — “सत्ता कुणाच्या हाती जाणार?”


चौकाचौकात, बाजारपेठेत, चहाच्या टपऱ्यांवर आणि सोशल मीडियावर निकालाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नगर परिषदेची सत्ता कोणाला मिळते, नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते, यावर शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा अवलंबून आहे. त्यामुळे हा निकाल केवळ राजकीय नसून, शिर्डीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
ब्रेकिंग अपडेट्सकडे लक्ष; निकालात कधीही मोठा उलटफेर शक्य
मतमोजणी प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे जात असताना कोणत्याही क्षणी मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिर्डीकरांचे लक्ष आता फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडे लागले आहे — शिर्डी नगर परिषदेची सत्ता अखेर कोणाच्या हाती जाणार?

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button