Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ

शिर्डी : शिर्डी शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील विविध विकासकामांचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजना सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “पाऊस सुरू होण्याच्या आत पावसाच्या पाण्याची योग्य व्यवस्था पूर्ण करण्यात येणार,” असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
लक्ष्मी नगर परिसरात पावसाळ्यात साचणारे पाणी, तुंबणाऱ्या गटारी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ड्रेनेज कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुनिता मंगेश त्रिभुवन, राजू जाधव, राजेंद्र त्रिभुवन, पांडुरंग मोरे, निरंजन बिडवे, मनोहर हिवाळे, सुनील नरोडे, निलेश बिडवे, सिंधूबाई मगरे, लताबाई वीर, मंगलबाई आरणे, हिराबाई माळी, सोनाली अहिरे, आशाबाई त्रिभुवन, संगीताबाई हिवाळे, दीपाली सुपेकर आणि साईनाथ चिंतामणी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन तसेच नगरसेविका सौ. त्रिभुवन ताई यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विकासकामांमुळे लक्ष्मी नगर परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button