Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

“साईंच्या नगरीत महिलादेखील असुरक्षित?” शिर्डीत साईराजे हॉटेलात आंघोळ करणाऱ्या तरुणीचे गुप्त शूटिंग आरोपी ‘रुमबॉय’वर गुन्हा दाखल!

अंबरनाथ (मुंबई) येथून शिर्डीत आलेली पिडीत तरुणी साईराजे  हॉटेलात थांबलेली असताना आरोपी रुमबॉय आरोपी हा अल्पवयीन असल्याने कायद्याने नाव टाकता येत नाही   (रा. साईराजे  हॉटेल पिंपळवाडी  शिर्डी) याने बाथरूममध्ये तिच्या आंघोळीचा व्हिडिओ चोरून शूट केला.
या घृणास्पद प्रकाराची माहिती मिळताच पीडित तरुणीने शिर्डी पोलीस ठाण्यात थेट तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

🟠 “साईंच्या नगरीत महिलादेखील असुरक्षित?” — भक्तांचा संतापाचा स्फोट! 😤

या घटनेनंतर साईनगरीत प्रचंड संताप उसळला आहे.
साईभक्तांनी थेट प्रश्न उपस्थित केले —
👉 “साईंच्या नगरीत महिलाही आता सुरक्षित नाहीत का?”
👉 “शिर्डीचं पावित्र्य अशा नीच लोकांनी का कलंकित करावं?”

साईभक्त, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या विकृत प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठविला असून “शिर्डीची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकरणांवर झडप घालावी!” अशी मागणी जोर धरत आहे.

🟡 भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि आता अश्लीलता — साईनगरीवर डाग! 💢

अलीकडच्या काळात साईनगरीत संस्थानातील विज घोटाळा, आर्थिक अनियमितता, काही हॉटेलांतील छेडछाड प्रकरणे, पेट्रोल पंपावरील गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
आता या “हॉटेल शूटिंग स्कँडल” मुळे साईनगरीवरील भक्तांचा विश्वास डळमळीत झाला आहे.

साईभक्तांचे म्हणणे आहे की,

> “साईंच्या नगरीत धर्माच्या नावाखाली अधर्म करणारे लोक बाबांच्या नावाला काळीमा लावत आहेत.
आता वेळ आली आहे — साईंचा ‘सटका’ त्यांना भोगावा लागेल!” ⚡

🟢 पोलिसांकडून तपास सुरू — नीच प्रवृत्तीला माफी नाही! 🙏

शिर्डी पोलीस प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला असून, आरोपीविरुद्ध कठोर कार्यवाहीचे आदेश दिल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
दरम्यान, साईभक्त, महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी सर्व हॉटेलांची तपासणी, CCTV ऑडिट आणि महिला सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची मागणी केली आहे.

📢 साईभक्तांचा एकमुखी इशारा:

> “साईंच्या पवित्र भूमीत घाणेरडे कृत्य करणाऱ्यांना माफी नाही!
भक्तीवर डाग लावणाऱ्यांवर आता थेट कारवाई हवी —
साईंचा सटका जवळ आलाय!” 🔥

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button