Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
राजकीयशिर्डी

१४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्यकीय उपचारांवर विश्वास!

राहाता | प्रतिनिधी
१४-१५ वर्षे एखाद्या आजारासोबत जगणे म्हणजे केवळ शारीरिक वेदना नव्हे, तर मानसिक आणि कौटुंबिक संघर्षही असतो. त्यात उपचार करूनही वारंवार त्रास कायम राहिला, तर रुग्णाचा वैद्यकीय व्यवस्थेवरील विश्वासही डळमळू लागतो. अहिल्यानगर येथील चंद्रशेखर मधुकरराव झोडगे यांचा अनुभव याच संघर्षाची कहाणी सांगणारा आहे.
‘कॉम्प्लेक्स फिस्टुला इन अॅनो’ अर्थात भगंदराच्या त्रासाने झोडगे हे तब्बल १४ ते १५ वर्षांपासून त्रस्त होते. अहिल्यानगरपासून सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत विविध ठिकाणी उपचार घेतल्यानंतरही समस्या कायम राहिली. लेझर, क्षारसूत्र आणि ओपन फिस्टुलेक्टॉमी अशा विविध उपचारपद्धतींच्या ५ ते ६ शस्त्रक्रिया झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


उपचार झाले… पण त्रास संपला नाही!
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासामुळे झोडगे यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः त्रस्त झाले होते. एलोपॅथी उपचारांसोबत युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि इतर पारंपरिक उपचारांचाही त्यांनी आधार घेतला. मात्र अपेक्षित आराम न मिळाल्याने अखेर उपचार घेण्याची इच्छाच कमी झाली होती.
याच काळात त्यांच्या मानलेल्या मुलाने आग्रह धरून त्यांना राहाता येथील साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. किरण गोरे यांच्याकडे आणले.


३००-४०० पानांची फाईल… डॉक्टरांनी घेतला सखोल अभ्यास
मोठ्या शहरांमध्ये उपचार करूनही फायदा झाला नाही, मग राहात्यात काय फरक पडणार, असा प्रश्न सुरुवातीला झोडगे यांच्या मनात होता. मात्र डॉ. किरण गोरे यांनी त्यांच्या सुमारे ३०० ते ४०० पानांच्या जुन्या वैद्यकीय फाईलचा आणि उपलब्ध वैद्यकीय अहवालांचा सखोल अभ्यास केला. रुग्णाची सद्यस्थिती तपासून त्यानुसार पुढील उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन सुरू करण्यात आले.
१५ दिवसांत फरक जाणवला; वर्षानुवर्षांचा त्रास कमी झाल्याचा दावा
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच रुग्णाच्या त्रासात लक्षणीय फरक जाणवू लागला. जखमेतून होणारा स्त्राव आणि पू पुसण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात कापसाची गरज भासत होती; उपचारानंतर हा त्रास जवळपास थांबल्याचे त्यांनी सांगितले.


दुखणे कमी झाले, दैनंदिन हालचाली सुलभ झाल्या आणि प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली. उपचाराच्या कालावधीत ८ ते ९ किलो वजन वाढल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
‘डॉक्टरांवरील विश्वास पुन्हा निर्माण झाला…’
उपचारानंतर झोडगे यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. किरण गोरे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. अनेक वर्षांच्या त्रासानंतर मिळालेल्या दिलाशामुळे पुन्हा वैद्यकीय उपचारांवर विश्वास निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कुटुंबीयांनीही डॉक्टरांच्या उपचारपद्धतीचे कौतुक करताना, मोठ्या शहरांतील वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य ग्रामीण भागातील तज्ज्ञ डॉक्टरांमध्येही उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यासोबतच रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष आणि आपुलकीने पाहणे ही बाबही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘Miracles do happen!’ — १४ वर्षांच्या संघर्षानंतर उमटले समाधानाचे शब्द
१४-१५ वर्षांचा आजार, अनेक उपचार, शस्त्रक्रिया आणि तरीही कायम असलेला त्रास… या प्रदीर्घ संघर्षानंतर राहाता येथे उपचार घेतल्यानंतर मिळालेला दिलासा झोडगे कुटुंबीयांसाठी भावनिक ठरला.
याच अनुभवातून “Miracles do happen” अशी भावना व्यक्त करत त्यांनी डॉ. किरण गोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
डॉ. किरण गोरे — MBBS, MS, Coloproctologist
साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता
संपर्क : 9405000454 / 9270245254

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button