Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शिर्डी, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.अकोले येथे आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे, द्राक्ष बागायतदार संघटनेचे कैलासराव भोसले, आबासाहेब थोरात, कपिल पवार, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ, कळस कृषी प्रदर्शन समितीचे सागर वाकचौरे, संदीप वाकचौरे, नामदेव मिसाळ आदी उपस्थित होते.


कृषीमंत्री श्री.कोकाटे म्हणाले, आतापर्यंत कृषी अवजारांची प्रदर्शने पाहिली आहेत. आज प्रथमच प्रत्यक्ष पीकांच्या शेतीसह असलेले प्रदर्शन पहात आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरूणांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ज्ञान प्राप्त होते. आज महाराष्ट्रात एका पीकांचे वेगवेगळे २०० प्रकारांच्या वाणांचे संशोधन झाले आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे यावर शासनाचा भर आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.


तरूणांना शेती क्षेत्राकडे वळविण्यासाठी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक खत व बियाणे न वापरता, प्रमाणित केलेली खते व बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी नकारात्मक होऊन खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमानंतर ,कृषीमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत पिकांच्या नवनवीन वाणांची माहिती जाणून घेतली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button