Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरशिर्डी

साईसंस्थानच्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या क्रीडा सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्‍या अंतर्गत नव्याने उभारलेल्या सर्व सुविधायुक्त शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध खेळांच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानांसह स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, टेबलटेनिस हॉल आणि कॅरम हॉल विकसित करण्यात आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हुताशनी पौर्णिमेच्या (होळी) निमित्ताने या क्रीडा सुविधांचा लोकार्पण सोहळा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळ्याला साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री विश्वनाथ बजाज, श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री औताडे तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.


याशिवाय, संस्थानच्या बांधकाम विभागाचे अभियंते, न्याती कन्स्ट्रक्शन व शानदार कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नव्या क्रीडा सुविधांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिध्द करता येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button