Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
क्राईमशिर्डी

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिवीगाळ करून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची शिर्डी पोस्टला फिर्याद! ‌

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी शासकीय विश्रामगृहात शिवसेना (शिंदे गट) सभासद नोंदणी सुरू असताना तेथे मीटिंगमध्ये कमलाकर कोते यांच्याबरोबर किरकोळ वाद झाले. मात्र ते पक्ष निरीक्षकांसमोर मिटवले गेले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र त्यानंतर कमलाकर कोते व त्यांचा मुलगा अतुल कमलाकर कोते यांनी आपल्याला आईवरून शिवीगाळ करत तुझे घर जाळून टाकीन, तुला जीवे मारून टाकीन, माझे वरपर्यंत हात आहेत असे म्हणून दमदाटी केली. त्यामुळे त्यांच्याकडून माझ्या जीवास धोका निर्माण झालेला आहे.

अशा आशियाची फिर्याद सुभाष साहेबरावं उपाध्ये यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे शिवसेना ( शिंदे गट)पक्षातच मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

सुभाष साहेबराव उपाध्ये यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दिनांक 16/04/2025 रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० च्या सुमारास शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे शिवसेना सभासद नोंदणीची मिटींग करिता गेलो असता माझे कमलाकर कोते यांचे सोबत किरकोळ वाद झाले.

त्यावेळी सदरचे वाद शिवसेना पक्षाचे निरीक्षक यांचे समोर मिटविले. मात्र कमलाकर कोते व त्यांचा मुलगा अतुल कमलाकर कोते याने गेटजवळ येवून मला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला गोळ्या घालु तुझे घर जाळून टाकू अशी धमकी दिली.

त्यानंतर मी शिर्डी पोलीस स्टेशन येथे रितसर दिनांक १७/०४/२०२५ रोजी NCR no. ०३१९/२०२५ तक्रार दिलेली आहे. या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 351/ 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर
आज दिनांक १८/०४/२०२५ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या दरम्यान मला घाबरविण्या करिता काही तरुणांनी मोटासायकलवरुन कोऱ्हाळे ते शिर्डी रस्त्यावर माझा पाठलाग केला व माझ्या मोटारसायकलला कट मारुन निघून गेले.

या प्रकारामुळे मी पुर्णपणे घाबरुन गेलो असुन कमलाकर कोते व अतुल कमलाकर कोते यांनीच सदरचे इसम पाठविले असावेत असा मला संशय आहे. या इसमांपासून माझ्या जीवीतांस धोका निर्माण झालेला आहे. मी पोलीस स्टेशनला त्यांचे विरोधात रीतसर तक्रार दाखल केल्याचा त्यांचा मनात राग असुन यातून त्यांचेकडून माझे जीवास धोका निर्माण झालेला आहे.

तरी सदर इसमांपासून मला पोलीस संरक्षण मिळावे व संबंधीत इसमांविरुध्द कायदेशीर कारवाई करावी . असे पत्रही त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातच मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button