Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

स्वच्छ, निर्मळ मन व स्पष्ट वकृत्व असणारे साधे भोळे व्यक्तिमत्व— बायजामा तात्या पा.कोते यांचे वंशज राजाभाऊ कोते पा.

संपूर्ण विश्वाला सर्व धर्म समभाव व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालेल्या शिर्डीच्या पुण्यनगरीत जन्माला येणे म्हणजे त्या व्यक्तीचे मोठे भाग्यच लागते. असे भाग्य राजेंद्र‌ कोते पा यांना नक्कीच लाभले आहे. कारण श्री साईंच्या पुण्यनगरीत त्यांचा जन्म झाला आहेच. मात्र श्री साईबाबांच्या कालावधीत निस्सिम भक्त असणाऱ्या बायजा मा, तात्या पाटील कोते यांच्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ते साईबाबांचे भक्त असणाऱ्या बायजा मा तात्या पा.कोते यांचे वंशज आहेत. असे नशीबवान असलेले राजेंद्र कोते पा. यांचा आज जन्मदिवस आहे. तो सर्वत्र मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने हितचिंतकांकडून साजरा केला जात आहे. राजेंद्र कोते पाटील हे एक सर्वसाधारण व स्पष्ट वकृत्व असणारे असे व्यक्तिमत्व असून नेहमी हसतमुख, दिलखुलास,व साधी त्यांची राहणीमान आहे. त्यांची पूर्व पारंपारिक चालत आलेली धार्मिक रुढी परंपरा ते आजही जपत आहेत.

त्यांची भक्ती श्रद्धा आजही मोठी आहे. बायजा मा पासून आजही ते साई मंदिरात दररोज नैवेद्य घेऊन जातात.साई पालखीलाही त्यांचा मान आहे. असे भाग्यवान असणारे राजेंद्र कोते पा. मोठ्या घरंदाज व धार्मिक कुटुंबात जन्माला आलेले असताना व बागायतदार, श्रीमंत कुटुंबात असतानाही ,सर्वसाधारण, गोरगरीब, दिनदलित यांना आपुलकीने बोलणारे,

सर्वांशी आपलेपणा असणारे, सुखदुःखाला धावून येणारे, कोणत्याही प्रसंगी एकमेकांना मदत करणारे, कुठे भेटले तर थांबून दोन शब्द प्रेमाचे बोलणारे, असे धार्मिक वृत्तीचे व साधे भोळे असे व्यक्तिमत्व असणारे राजाभाऊ कोते पा. हे सर्वांमध्ये एक लोकप्रिय असे व्यक्तिमत्व असून त्यामुळे त्यांचा आज शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी असणारा वाढदिवस शिर्डी व परिसरातही हितचिंतकांकडून त्यांना मोबाईलवर शुभेच्छा देत, प्रत्यक्ष भेटून,

सत्कार करत तसेच विविध कार्यक्रमाने साजरा केला जात आहे .त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. दैनिक साई दर्शन परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक खूप खूप शुभेच्छा आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button