Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
राजकीय

उद्धव ठाकरेंसह सुषमा अंधारेंवर ज्योती वाघमारेंचा हल्ला

शिर्डी (अहमदनगर) : एककीडं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे मैदान गाजवत असताना, आज श्रीरामपूर येथे ज्योती वाघमारे यांनी पहिल्याच भाषणात सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. ज्या आक्का बाईला उद्धव ठाकरे स्टार प्रचारक म्हणून फिरवत आहेत. त्याच आक्काबाईनं बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हटलं होतं. स्वतःचा बाप्पाचा अपमान करणाऱ्या आक्काबाईला उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून मिरवत आहेत. नागरिक उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलीय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्याला कोणीही मतदान करणार नाही : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्प महाविजय प्रचारार्थ उद्धव ठाकरेंसह सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या प्रचारक ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केलीय. भाषणात बोलताना कधी प्रभू श्रीराम यांचा अपमान, शबरीच्या भक्तीचा अपमान, असं हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या आक्काबाई ज्या पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत, त्या पक्षाला कोणीही मतदान करणार नाही.

kamlakar

“कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गाण्याचं आणि…: शिर्डी लोकसभेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेवून सांगितलं होतं शिवसेना सोडणार नाही. साईबाबांची शपथ धुडकावून लावत वेगवेगळ्या पक्षात जाणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांची परस्थिती अशी झालीय की,

“कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गाण्याचं आणि लेकरू मण्याचं” अश्या शेलक्या भाषेत वाघमारे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका केलीय. महायुतीचा मेळावा असल्यानं व्यासपीठावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक उपस्थित होते. त्याचं नावे घेतांनाही ज्योती वाघमारे यांनी जुळविलेल्या यमकानेही एकच हाशा झाल्याचं बघावयास मिळलंय.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button